महायुतीत भाजप मोठा पक्ष आहे, याशिवाय शिवसेना शिंदे व राष्ट्रवादी अजित पवार पक्ष यांचा मंत्रिपदासाठीचा ताळमेळ घालताना दमछाक होणार आहे.
कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीच्या (Kolhapur Assembly Elections) निकालानंतर जिल्ह्यातील कुणाला मंत्रिपदाची संधी मिळणार याविषयीची उत्सुकता लागली आहे. नव्याने निवडून आलेल्या आमदारांत पालकमंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांचे मंत्रिपद निश्चित असून, राधानगरीतून ‘हट्ट्रिक’ केलेले आमदार प्रकाश आबिटकर (Prakash Abitkar) यांनाही मंत्रिपदाची संधी मिळण्याची शक्यता आहे.