जिल्ह्यामध्ये एकूण १० विधानसभा मतदारसंघांपैकी २ विधानसभा मतदारसंघातून ४ उमेदवारांनी ५ उमेदवारी अर्ज माघारी घेतले.
कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीमध्ये (Kolhapur Assembly Elections) अपक्ष म्हणून अर्ज भरलेल्या चौघांनी उमेदवारी अर्ज माघारी घेतला. यामध्ये दक्षिण विधानसभा मतदारसंघातून गोकुळ संचालिका शौमिका महाडिक (Shoumika Mahadik) यांनी आपला एक अपक्ष उमेदवारी अर्ज मागे घेतला. आमदार ऋतुराज पाटील (Ruturaj Patil) यांच्या पत्नी पूजा पाटील यांनी अपक्ष म्हणून दाखल केलेले दोन उमेदवारी अर्ज माघारी घेतले, तर उत्तर विधानसभा मतदारसंघातून माजी आमदार मालोजीराजे छत्रपती यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज माघारी घेतला.