शरद पवार यांनी राज्यात सत्ता बदलाच्या केलेल्या निर्धाराला मिळत असलेला प्रतिसाद पाहून राज्यभरात महायुतीमधील नेते ‘तुतारी’ हाती घेण्यास पुढे आले.
कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीत (Kolhapur Lok Sabha Election Result) महाविकास आघाडीच्या माध्यमातून मिळालेल्या यशाने राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार (Sharad Pawar) पक्षाच्या (गटाच्या) कोल्हापूर जिल्ह्यातील कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढला. त्यावर त्यांनी विधानसभेच्या पाच जागांची पक्षश्रेष्ठींकडे मागणी केली; पण त्यातील तीन जागा पदरात पडल्या. मात्र, त्याठिकाणी ताकदीने लढा देऊनही त्यांना विजयाची ‘तुतारी’ फुंकता आली नाही.