महायुतीत जागा भाजपला गेली तर माजी नगरसेवक सत्यजित कदम, राहुल चिक्कोडे, महेश जाधव की कृष्णराज महाडिक अशी इच्छुकांची मोठी यादी आहे.
कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात (Kolhapur North Assembly Constituency) महायुतीची उमेदवारी कोणाला मिळणार, यावरच या मतदारसंघातील महाविकास आघाडीचा उमेदवार ठरणार आहे. ‘महाविकास’मध्ये उत्तरची जागा काँग्रेसला (Congress) हे जवळपास निश्चित आहे. प्रबळ आणि तयारी केलेल्या उमेदवारांची वानवा असल्याने विरोधकांचा उमेदवार जाहीर झाल्यानंतरच काँग्रेसचा उमेदवार जाहीर होईल.