कोल्हापूर उत्तरची जागा काँग्रेसला मिळाली आणि नाट्यपूर्ण घडामोडीनंतर खानविलकर यांच्या कन्या सौ. मधुरिमाराजे यांना पक्षाची उमेदवारी मिळाली.
Kolhapur North Assembly Election : राजकारणात कोणी कायमचा कुणाचा मित्र किंवा शत्रू असत नाही, याची प्रचिती आता कोल्हापूर उत्तरच्या निवडणुकीवरून येत आहे. २००४ च्या विधानसभेच्या निवडणुकीत दिवंगत माजी मंत्री दिग्विजय खानविलकर (Digvijay Khanvilkar) यांचा पराभव केलेल्या आमदार सतेज पाटील (Satej Patil) यांच्यावर आता त्यांच्याच मुलीच्या विजयाची जबाबदारी आली आहे.