‘पाच वर्षांपूर्वी हीच ती तारीख २४ ऑक्टोबर २०१९. यावेळी राजेश क्षीरसागर यांचा पराभव झाला होता.
कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर विधानसभा (Kolhapur North Assembly) मतदारसंघातून महायुतीकडून राजेश क्षीरसागर (Rajesh Kshirsagar) यांची उमेदवारी काल सकाळी मुंबईत निश्चित झाली. याबाबतचे एसएमएस त्यांनी पक्षातील प्रमुखांना दिले आहेत. यादी केव्हाही जाहीर होईल, त्यामध्ये त्यांचे नाव निश्चित असेल, असा विश्वास जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण यांनी ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केला. क्षीरसागर यांच्याकडून रात्री उशिरा याला दुजोरा मिळाला.