''पराभवाची खात्री होऊ लागल्यामुळे सतेज पाटील बिनबुडाचे आरोप करत आहेत. आम्ही विकासाच्या जोरावर निवडणूक लढवणार आहे.''
कोल्हापूर : ‘शंभर कोटींच्या रस्त्याची वर्कऑर्डर निघाली नाही म्हणणाऱ्या आमदार सतेज पाटील यांनी खरी माहिती जनतेला द्यावी, असे आवाहन मी करतो. काँग्रेसने पराभवाचा धसका घेतल्यामुळेच कोल्हापूर उत्तरमध्ये उमेदवारी बदलावी लागली. विद्यमान आमदार स्वतःहून शिवसेनेत आल्या आहेत. यामुळे आमदार पाटील यांनी आत्मपरीक्षण करावे. काल त्यांनी पत्रकार परिषदेत केलेल्या आरोपाबद्दल मी निषेध करतो. आम्ही कोणाच्या मागे लागलो नाही. अनेकजण दिवाळीनंतर शिवसेनेत येतील’, असा टोला राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर (Rajesh Kshirsagar) यांनी पत्रकार परिषदेत लगावला.