लाटकर लढण्यावर ठाम राहील्याने शनिवारी (ता. २) त्यांची शाहू महाराज, मालोजीराजे यांनी समजूत काढण्याचा प्रयत्न केला. या बैठकीत लाटकर यांनी काही राजकीय मागण्या केल्याचे समजते.
कोल्हापूर : विधानसभेची रंगत आता कुठे सुरू झाली असतानाच ‘कोल्हापूर उत्तर’मधून काँग्रेसच्या उमेदवार मधुरिमाराजे छत्रपती (Madhurimaraje Chhatrapati) यांनी माघार का घेतली, असा प्रश्न आता त्यांच्या कार्यकर्त्यांसह सर्वांनाच पडला आहे. घरगुती समस्या, ईगो दुखावला की, अन्य काही कारणे आहेत याची उलटसुलट चर्चा रंगली आहे.