आमदार सतेज पाटील म्हणाले, ‘कोल्हापूर शहरातील ही निवडणूक एकट्या राजेश लाटकर यांची नाही, तर कोल्हापूरची जनता विरुद्ध राजेश क्षीरसागर अशी आहे.
कोल्हापूर : ‘जिल्ह्यात महायुतीने साडेचार हजार कोटींच्या कामाचा प्रारंभ केला. मात्र, प्रत्यक्षात काहीही न देता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी कोल्हापूरची फसवणूक केली आहे. शंभर कोटींची घोषणा झाली ते १०० कोटी गेले कोठे? असा सवाल करत सामान्य घरातील सर्वसामान्य कार्यकर्त्याला उमेदवारी मिळाली पाहिजे, हाच हेतू ठेवून राजेश लाटकर (Rajesh Latkar) यांना काँग्रेस पुरस्कृत उमेदवार म्हणून पाठिंबा दिला. लाटकर हे त्सुनामीची ‘लाट’ आहेत, या लाटेत विरोधकांना ते बुडवून टाकतील. यासाठी ‘प्रेशर कुकर’ या त्यांच्या निवडणूक चिन्हाचे बटण दाबून त्यांना प्रचंड मतांनी विजयी करा’, असे आवाहन खासदार शाहू महाराज (Shahu Maharaj) यांनी केले.