मधुरिमाराजेंनी माघार का घेतली? सामान्य कार्यकर्त्यासाठी का सोडली जागा? खासदार शाहू महाराजांनी केला मोठा खुलासा

Kolhapur North Assembly Election : एका कुटुंबात दोन पदे नकोत म्हणून मधुरिमाराजे यांनी निवडणूक लढवायची नाही, असे आमचे आधीच ठरले होते.
Kolhapur North Assembly Election
Kolhapur North Assembly Electionesakal
Updated on
Summary

लाटकर यांनी उमेदवारी मागे घेतली तरच लढायचे, असे आमचे ठरले होते आणि लाटकर कुटुंबीयांसोबत झालेल्या चर्चेतही आम्ही त्यांच्याजवळ ही गोष्ट स्पष्ट केली होती.

कोल्हापूर : कोल्हापूर उत्तरच्या (Kolhapur North Assembly Election) रिंगणात माजी नगरसेवक राजेश लाटकर (Rajesh Latkar) हे माघार घेणार नसतील तर आम्ही लढायचे नाही, असे ठरवले होते. त्यामुळेच सामान्य कार्यकर्त्याच्या सन्मानासाठी मधुरिमाराजे छत्रपती (Madhurimaraje Chhatrapati) यांचा अर्ज मागे घेतल्याचा खुलासा खासदार शाहू महाराज यांनी पत्रकाद्वारे केला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.