क्षीरसागर यांनी विरोधकांच्या बालेकिल्ल्यातील मते खेचण्याचा करिष्मा केला. त्यामुळे लाटकर यांना मताधिक्य मिळाले नाही.
कोल्हापूर : ज्याच्या जोरावर उत्तर विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पुरस्कृत उमेदवाराला निवडून आणण्याची रणनीती आखली होती, तो आमदार सतेज पाटील (Satej Patil) यांचा कसबा बावडा हा बालेकिल्लाच ढासळल्याचे मतमोजणीतून स्पष्ट झाले. एकट्या कसबा बावडा परिसरातून दहा हजारांहून अधिक मताधिक्याची अपेक्षा असताना विचारेमाळ, जाधववाडी, सदर बाजार या आजूबाजूच्या परिसराचे मिळून चौथ्या फेरीअखेर फक्त तीन हजारांवरच मताधिक्य राहिले. तिथेच पराभवाची नांदी झाली.