'महाराष्‍ट्र लुटून गुजरातचा विकास करणाऱ्या बाप-लेकांना सिंधुदुर्गात थारा देऊ नका'; उद्धव ठाकरेंचा राणे घराण्यावर हल्ला

Konkan Assembly Election 2024 Uddhav Thackeray : लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी घराणेशाहीवर घणाघाती टीका करत होते; पण सिंधुदुर्गात काय चाललंय?
Uddhav Thackeray
Uddhav Thackerayesakal
Updated on
Summary

''कोकणचे वैभव कायम राखायचे असेल तर तुम्हाला भगव्याशिवाय आणि मशालीशिवाय पर्याय नाही.''

कणकवली/सावंतवाडी, मालवण : ‘आमच्यावर घराणेशाहीचा आरोप करणाऱ्या मोदींना सिंधुदुर्गातील राणेंची घराणेशाही दिसत नाही का?’ असा सवाल करून ‘महाराष्‍ट्र लुटून गुजरातचा विकास करणाऱ्या भाजपला सिंधुदुर्गातील बाप-लेकांसह काहीजण साथ देत आहेत. इथली पाणबुडी गुजरातला गेली तरीही ते गप्प राहिले. अशा महाराष्‍ट्रद्रोही बाप-लेकांना सिंधुदुर्गात थारा देऊ नका,’ असे आवाहन शिवसेना- उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी कणकवलीतील सभेत केले. सावंतवाडीत त्यांनी दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांच्यावर कडाडून टीका केली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.