जाधवांच्या वाहनांचा ताफा घराबाहेर लागल्यानंतर कार्यकर्त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला. त्यानंतर भास्कर जाधव यांनाही रडू कोसळले.
-अरविंद कोकजे, रत्नागिरी
Konkan Assembly Election : शिवसेनेतून (Shiv Sena) बाहेर पडून अपक्ष निवडणूक लढवून जिंकण्याची कामगिरी २००४ ला भास्कर जाधव यांच्या नावे झाली असती; मात्र त्या वेळच्या राजकीय घडामोडींमुळे त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. त्यानंतर राष्ट्रवादीत प्रवेश करून त्यांनी आपले नेतृत्व सिद्ध केले; मात्र ही निवडणूक लक्षात राहिली, ती भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी शिवसेना सोडल्यानंतर पुढील निर्णय जाहीर न केल्यास आम्ही घरात गणपती आणणार नाही, अशी भूमिका त्यांच्या समर्थकांनी घेतल्यामुळे.