‘‘समोरच्यांचे गेल्या पाच वर्षांतील भरपूर मटेरिअल आम्ही गोळा केले असून, ते प्रचारादरम्यान बाहेर काढणार आहे.’’
सातारारोड : हुकूमशाही विरुद्धच्या लढाईला कोरेगाव मतदारसंघातील (Koregaon Constituency) स्वाभिमानी जनतेने सज्ज व्हावे, पक्षाकडून उमेदवारी लवकरच जाहीर होईल. येत्या गुरुवारी (ता. २४) विधानसभेच्या निवडणुकीसाठी कोरेगावातून उमेदवारी अर्ज दाखल करणार असून, त्या दिवशी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आमदार शशिकांत शिंदे (MLA Shashikant Shinde) यांनी केले.