गेली सुमारे तीन दशके सिंधुदुर्ग जिल्ह्याचे राजकारण हे नारायण राणे यांच्या भोवतीच फिरत राहिले आहे.
कणकवली : खासदार नारायण राणे (Narayan Rane) यांनी आता आपल्या पुढच्या पिढीच्या राजकारणासाठी नवीन वाट स्वीकारली आहे. शिवसेना, काँग्रेस, स्वतःचा स्वाभिमान पक्ष आणि आता भाजप (BJP) अशी राजकीय वाटचाल करून त्यांनी पुढच्या पिढीच्या हाती पुन्हा एकदा शिवसेनेचा धनुष्यबाण दिला आहे. आता या वाटचालीचे यशापयश कुडाळच्या निवडणूक निकालावर अवलंबून असणार आहे.