राणे कुटुंबाचे जिल्ह्यातील राजकारण सुमारे ३५ वर्षे जुने आहे. राणे या मतदारसंघातील मालवण तालुक्याशी ११९० पासून थेट जोडले गेले आहेत.
कुडाळ : मतदारसंघाला (Kudal Assembly Election) विकासाच्या स्पर्धेत टॉप फाईव्हमध्ये नेण्याबरोबरच नारायण राणेंच्या २०१४ ला झालेल्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी निवडणूक रिंगणात उतरल्याचे माजी खासदार नीलेश राणे (Nilesh Rane) यांनी जाहीर केल्याने राणे कुटुंबासाठी कुडाळची विधानसभेची लढाई प्रतिष्ठेची बनली आहे. त्यांना ठाकरे शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांचे तगडे आव्हान असल्याने महायुतीला निवडणुकीमध्ये कौशल्य पणाला लावावे लागणार आहे.