दोन्ही गटांतील समजूतदार पदाधिकाऱ्यांनी हे प्रकरण शांत केले. त्यानंतर पोलिस घटनास्थळी आले.
कुडाळ : येथे विधानसभा उमेदवार अर्ज छाननी प्रक्रिया शांतपणे सुरू असतानाच कुडाळ-मालवण मतदारसंघाच्या निवडणूक (Kudal-Malvan Constituency Election) निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयाखाली तहसीलच्या प्रवेशद्वारावर महायुती आणि ठाकरे शिवसेनेचे (Shiv Sena) कार्यकर्ते एकमेकांना भिडले. दोन्हीकडच्या कार्यकर्त्यांत खडाजंगी झाली. दोन्ही गटांतील समजूतदार पदाधिकाऱ्यांनी हे प्रकरण शांत केले. त्यानंतर पोलिस घटनास्थळी आले. त्यांनी सर्व कार्यकर्त्यांना बाहेर काढले. यामुळे काहीकाळ वातावरण तंग झाले होते.