Latur Assembly Election 2024 : लातूर निवडणुकीच्या रिंगणात कोण राहणार, याची उत्सुकता

Latur Vidhan Sabha Election 2024 : दिवाळीमुळे आलेल्या सलग सुट्यांमुळे उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी उमेदवारांकडे आता केवळ ४ नोव्हेंबर हा एकच दिवस शिल्लक राहिला आहे. दिवसभरातील केवळ सव्वापाच तासांत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत.
Latur Vidhan Sabha Election 2024
Latur Vidhan Sabha Election 2024sakal
Updated on

लातूर : दिवाळीमुळे आलेल्या सलग सुट्यांमुळे उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी उमेदवारांकडे आता केवळ ४ नोव्हेंबर हा एकच दिवस शिल्लक राहिला आहे. दिवसभरातील केवळ सव्वापाच तासांत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत. त्यामुळे या सव्वापाच तासांत अर्ज मागे घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांबरोबरच प्रशासनाची चांगलीच धावपळ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, निवडणुकीच्या रिंगणात कोण कोण राहणार, हे सोमवारी (ता. चार) स्पष्ट होणार असल्याने याबाबत नागरिकांमध्ये उत्सुकता वाढत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.