लातूर : विधानसभेच्या लातूर शहर मतदारसंघात उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी ११ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. या मतदारसंघात निवडणुकीच्या रिंगणात २३ उमेदवार राहिले असले तरी काँग्रेसचे माजीमंत्री आमदार अमित देशमुख विरुद्ध भारतीय जनता पक्षाच्या डॉ. अर्चना पाटील चाकूरकर यांच्यातच सरळ सामना होणार आहे.