लातूर : भारत निवडणूक आयोगाने घोषित केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी ता. २० नोव्हेंबरला मतदान होत आहे. या अनुषंगाने मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या सूचनेनुसार लातूर जिल्हा क्रीडा संकुल येथे वॉकेथॉन, मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते.