मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत प्रामुख्यानं महाविकास आघाडी आणि महायुती या दोन आघाड्यांमध्ये काटे की टक्कर पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर परिवर्तन महाशक्ती नावाची तिसरी आघाडी देखील यंदा निवडणुकीच्या रिंगणात आहे. त्यामुळं महाराष्ट्रात निश्चितपणे काय होईल हे सध्यातरी सांगता येणं शक्य नाही. पण राज्यात झालेल्या सर्व्हेंमधून मात्र वेगळंच चित्र पाहायला मिळत आहे. लोकपोलचा निवडणूक पूर्व सर्व्हे जाहीर झाला असून यामध्ये महाविकास आघाडीला स्पष्ट बहुमत तर महायुतीच्या जागांचाही अंदाज सांगण्यात आला आहे.