'शहर मध्य'मधील प्रणिती शिंदेंच्या बालेकिल्ल्यात कमळ फुलणार? २०१४ व २०१९ च्या तुलनेत यंदा वाढले ३३ हजार मतदान; काँग्रेस, ‘एमआयएम’लाही विजयाची आशा

तीन टर्म म्हणजेच २००९ पासून काँग्रेसचे वर्चस्व राहिलेल्या शहर मध्य मतदारसंघात पहिल्यांदाच भाजपचे कमळ फुलेल, अशी स्थिती आहे. लोकसभा निवडणुकीत एक लाखांहून अधिक मते भाजपच्या उमेदवाराला येथूनच मिळाली आणि भाजपने हा मतदारसंघ विधानसभेला आवर्जुन स्वत:कडे ठेवला. यंदा मागील दोन निवडणुकांच्या तुलनेत अधिक मतदान (एकूण ५७.७७ टक्के) झाले आहे. त्यात ९९ हजार ७६१ लाडक्या बहिणींचे मतदान आहे.
solapur city central
solapur city central sakal
Updated on

सोलापूर : तीन टर्म म्हणजेच २००९ पासून काँग्रेसचे वर्चस्व राहिलेल्या शहर मध्य मतदारसंघात पहिल्यांदाच भाजपचे कमळ फुलेल, अशी स्थिती आहे. लोकसभा निवडणुकीत एक लाखांहून अधिक मते भाजपच्या उमेदवाराला येथूनच मिळाली आणि भाजपने हा मतदारसंघ विधानसभेला आवर्जुन स्वत:कडे ठेवला. यंदा मागील दोन निवडणुकांच्या तुलनेत अधिक मतदान (एकूण ५७.७७ टक्के) झाले आहे. त्यात ९९ हजार ७६१ लाडक्या बहिणींचे मतदान आहे. याच मतांच्या जोरावर १५ वर्षे काँग्रेसने जपलेला बालेकिल्ला भाजप काबिज करेल, असे मानले जात आहे. दुसरीकडे काँग्रेस व एमआयएमच्या उमेदवारांनाही विजयाची खात्री आहे.

महायुतीच्या जागा वाटपात भाजपसमोर बार्शी किंवा शहर मध्य या दोन मतदारसंघाचे पर्याय होते. तरीपण, ऐनवेळी बार्शीचे विद्यमान आमदार राजेंद्र राऊत यांना शिवसेनेत जायला सांगून भाजपने शहर मध्य हा मतदारसंघ स्वत:कडे ठेवला. त्यामागील कारण म्हणजे भाजपला लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून एक लाखांवर मते मिळाली होती. पक्षाअंतर्गत नाराजी असतानाही पक्ष नेतृत्वाने तरुण चेहरा म्हणून देवेंद्र कोठेंना पहिल्यांदाच विधानसभेच्या मैदानात उतरविले. पक्षातील नाराजांची मनधरणी करण्यात आली व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचीही नाराजी दूर करून शेवटच्या क्षणी त्यांना सोबत घेण्यात भाजपला यश मिळाले. मोची समाजाची नाराजी ओळखून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून या समाजातील पाच माजी नगरसेवकांची साथ भाजपला मिळवून देण्यात स्थानिक नेतृत्व यशस्वी ठरले.

दुसरीकडे काँग्रेसला मात्र या मतदारसंघातील नाराजी दूर करता आली नाही. मुस्लिमांचे मतदान निर्णायक असलेल्या या मतदारसंघात माकपकडून नरसय्या आडम, एमआयएमकडून फारूक शाब्दी व बंडखोरी करून तौफिक शेख यांनी निवडणूक लढविली. त्यांनाही मुस्लिम मतांची मोठी आशा होती. या चौघांमध्ये मुस्लिम मतांचे विभाजन होईल हा भाजपचा अंदाज खरा ठरत असल्याचे चित्र मतदानादिवशी दिसून आले. खासदार प्रणिती शिंदे यांनी २००९ पासून हा मतदारसंघ स्वत:कडे ठेवला, विशेष म्हणजे मोदी लाटेतही त्यांनी विजय खेचून आणला होता. मात्र, यंदा खरी लढत भाजपविरुद्ध एमआयएम अशीच झाल्याचे बोलले जात आहे. तरीपण, काँग्रेस विजयाच्या स्पर्धेत नक्कीच आहे. आता मतदारांचा कौल नेमका कोणाच्या बाजूने राहिला हे उद्या (शनिवारी) स्पष्ट होईल. सध्यातरी अपक्षांसह सर्वच उमेदवार आपणच विजयी होणार म्हणून गुलाल उधळायच्या तयारीत आहेत.

तीन निवडणुकांमधील मतदान

  • २०१४

  • एकूण मतदान

  • २,७८,११९

  • झालेले मतदान

  • १,६४,०४१

  • विजयी उमेदवाराची मते

  • ४६,९०७

-------------------------------------------------------------------------

  • २०१९

  • एकूण मतदान

  • ३,०२,११६

  • झालेले मतदान

  • १,६७,५६९

  • विजयी उमेदवाराची मते

  • ५१,४४०

  • -----------------------------------------------------------------------

  • २०२४

  • एकूण मतदान

  • ३,४६,६७७

  • झालेले मतदान

  • २,००,२९१

  • विजयी उमेदवाराची मते

  • ----

‘शहर मध्य’मध्ये भाजपला वाटणारे निर्णायक मुद्दे...

  • तरुण चेहरा‌,पहिल्यांदाच निवडणूक लढणाऱ्या उमेदवाराकडून तरुणांसह महिलांना अपेक्षा

  • लाडकी बहीण मेळाव्यांचा होईल लाभ, ९९ हजार ७६१ महिलांनी केले मतदान

  • मतदानाच्या दिवशी आडम मास्तरांनी कोठेंना पाठिंबा दिल्याची सोशल मीडियावर अफवा

  • हिंदुत्वाचा फॅक्टर चालणार, पाच वर्षांत यंदा वाढले ४४ हजार ५२८ मतदार

  • मुस्लिम मतविभाजनाचा व वाढलेल्या मतांचा सर्वाधिक लाभ भाजपलाच होईल अशी स्थिती

  • मोची, मुस्लिम समाजाची काँग्रेस नेतृत्वावर नाराजी अन्‌ मोची समाजाचा भाजपला पाठिंबा तर तौफिक शेख यांची बंडखोरी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.