विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले. कर्जत-जामखेड विधानसभा निवडणुकीकडे जिल्ह्याचे लक्ष वेधले गेले. महाविकास आघाडीचे मतदारसंघाचे विद्यमान आमदार रोहित पवार विरुद्ध महायुतीचे उमेदवार विधानपरिषदेचे आमदार प्रा. राम शिंदे यांच्यात होणार आहे. २०१९ च्या निवडणुकीत आणि आता निवडणुकीत बराच फरक आहे.
२०१९ च्या कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीसह महाविकास आघाडीचे तुलनेत नवखे उमेदवार रोहित पवार आणि महायुतीतील कॅबिनेट मंत्री प्रा. राम शिंदे यांच्यात लढत झाली. सुरुवातीला एकतर्फी वाटणारी ही निवडणूक शेवटच्या टप्प्यात अत्यंत चुरशीची बनली. ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे नातू रोहित पवार आणि मंत्री मंडळातील वजनदार मंत्री राम शिंदे यांच्यातील लढतीकडे राज्याचे लक्ष वेधले गेले. या निवडणुकीत पवार यांनी ४३ हजार तीनशे सत्तेचाळीस मतांनी विजय संपादित केला.