कोल्हापूर: कोल्हापुरातील काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार मधुरिमाराजे छत्रपती यांनी आज अचानक माघार घेतल्याने कोल्हापूर उत्तर मतदारसंघाच्या निवडणुकीत नाट्यमय वळण आले. आज दुपारपासून राजेश लाटकर माघार घेणार का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. मात्र, मधुरिमाराजे यांनीच माघार घेतल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. या माघारीमुळे काँग्रेसमध्ये खळबळ उडाली असून, राज्यभर हा चर्चेचा विषय ठरला. पुन्हा एकदा काँग्रेसवर नामुष्की ओढावली आहे. या मतदारसंघातून काँग्रेसचे चिन्ह गायब झाले आहे.