विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी काॅंग्रेसच्या अधिकृत उमेदवार मधुरिमा राजे यांनी उमेदवारी अर्ज नाट्यमयरित्या मागे घेतल्यानंतर सतेज पाटील यांनी संताप व्यक्त केला होता. यांनतर उलटसुलट चर्चा सुरु झाली. आता खासदार शाहू छत्रपती यांनी निवेदन प्रसिद्ध करत उमेदवारी माघारी घेण्याचे कारण स्पष्ट केले आहे.