नागपूर : लोकसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का मोठ्या प्रमाणात घसरला होता. त्यामुळे प्रशासनासोबतच राजकीय नेत्यांसह पक्षाची झोप उडाली होती. आता विधानसभेच्या निवडणुका काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहे. त्या पार्श्वभूमीवर अनेक क्षेत्रातून मतदान करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.