मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणात ‘लाडकी बहीण’ योजना महायुतीला लाभदायक ठरण्याबाबत राजकीय अंदाज व्यक्त होत असताना महाविकास आघाडीने (मविआ) देखील महिलांना भाऊबीज ओवाळणी द्यायचे ठरवले आहे. यासाठी प्रत्येक महिन्यातील रक्कम दोन हजार असावी की तीन हजार याबद्दल ‘मविआ’च्या घटक पक्षांमध्ये वेगवेगळी मते होती. मात्र महायुती देत असलेल्या दीड हजार रुपयांपेक्षा किमान पाचशे रुपये मदत वाढवत दोन हजार रुपये दर महिन्याला द्यायचा, असा निर्णय जाहीरनामा समितीने घेतला आहे.