Uddhav Thackeray: दिल्ली दौरा फळाला! मविआचा प्रमुख चेहरा ठरला, CM पदाबाबत देखील मोठी माहिती

Uddhav Thackeray to Lead Mahavikas Aghadi Campaign : राज्यात विधानसभा निवडणुकांची तयारी जोरात सुरू आहे. महाराष्ट्र काँग्रेस निवडणूक प्रभारी रमेश चेन्निथला यांनी महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावर विचारलेल्या प्रश्नावर उत्तर दिले.
sharad pawar uddhav thackeray rahul gandhi.jpg
sharad pawar uddhav thackeray rahul gandhi.jpgesakal
Updated on

नवी दिल्ली - महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका लवकरच होणार आहेत आणि त्यासाठी सर्व राजकीय पक्ष आपापल्या तयारीत व्यस्त आहेत. राज्यात सत्ताधारी महायुती म्हणजेच एनडीए आणि विरोधी पक्ष महाविकास आघाडी (एमवीए) यांच्यात वादविवाद सुरू आहेत. एकूणच प्रदेशात राजकीय हालचाल आता हळूहळू वाढू लागली आहे. याच दरम्यान, महाविकास आघाडीत मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असेल, यावरून चर्चा सुरु असताना मोठी माहिती समोर आली आहे.

उद्धव ठाकरे हेच राज्यातील महाविकास आघाडीच्या प्रचाराचे प्रमुख नेते असतील. त्यांच्या नेतृत्वात विधानसभेचा प्रचार होणार आहे. पण मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून उद्धव ठाकरे यांचे नाव आताच जाहीर होणार नाही. निवडणुकीनंतर मुख्यमंत्री कोण होणार हे ठरवले जाईल. महाविकास आघाडी सरकार असताना उद्धव ठाकरे यांनी केलेले काम आणि नेतृत्व यामुळे त्यांच्याच हाती सूत्र देण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती सुत्रांनी दिली आहे.

काँग्रेसच्या सूचना-

काँग्रेसच्या हायकमांडने राज्यातील काँग्रेस नेत्यांना माहिती दिली आहे की, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात प्रचार होणार आहे. सोबतच INDIA आघाडीत असणाऱ्या इतर छोट्या पक्षांना देखील आघाडीत सामावून घेण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

विधानसभा निवडणुकांची तयारी-

राज्यात विधानसभा निवडणुकांची तयारी जोरात सुरू आहे. महाराष्ट्र काँग्रेस निवडणूक प्रभारी रमेश चेन्निथला यांनी महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावर विचारलेल्या प्रश्नावर उत्तर दिले की, सध्या आम्ही मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावर चर्चा केलेली नाही. महाविकास आघाडी हा आमचा चेहरा आहे आणि त्याच चेहऱ्यावर आम्ही निवडणूक लढणार आहोत. मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावर आमची कोणतीही चर्चा झालेली नाही आणि निवडणुकीनंतरच आम्ही मुख्यमंत्री कोण होणार हे ठरवू.

sharad pawar uddhav thackeray rahul gandhi.jpg
PM Modi Speech: महिलांवरील गुन्ह्यांवर मोदी सरकार कठोर पाऊलं उचलणार, शिक्षेबाबत मोठं वक्तव्य, नेमकं काय म्हणाले?

संजय राऊत यांचा दावा-

शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे संजय राऊत यांनी म्हटले की, राज्यात पुढील सरकार ठाकरे २ चे बनेल. महाराष्ट्रात उद्धव ठाकरेच येणार आहेत. संजय राऊत यांनी स्पष्ट केले की ठाकरे 2 म्हणजे महाविकास आघाडी. ठाकरे 1 सरकारही महाविकास आघाडीचीच होती, यावेळी ठाकरे 2 सरकार येईल आणि त्याला कोणीही थांबवू शकत नाही.

फडणवीसांवर प्रतिक्रिया-

भाजपने देवेंद्र फडणवीस यांना निवडणुकीची कमान दिल्याबद्दल राऊत म्हणाले की, ही चांगली गोष्ट आहे. नरेंद्र मोदी आणि अमित शाह प्रचारासाठी महाराष्ट्रात येणार आहेत आणि फडणवीस यांची प्रमुख भूमिका असेल तर आमच्यासाठी हा शुभ संकेत आहे.

sharad pawar uddhav thackeray rahul gandhi.jpg
Jayant Patil: मराठा आंदोलकांनी असं काय केलं की शांत, सयंमी जयंत पाटलांचा पारा चढला, लातूरमध्ये काय घडलं? VIDEO पाहा...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.