Vidhansbha Election : शिंदे सरकारला मोठा झटका! बडा नेता आपल्या पक्षासह महायुतीतून बाहेर; स्वबळावर लढवणार विधानसभा

Mahadev Jankar Left Mahayuti Ahed of Assembly Election 2024 : राज्यातील विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून येत्या २० नोव्हेंबर रोजी राज्यात मतदान पार पडणार आहे.
CM Shinde Govt
CM Shinde Govt
Updated on

राज्यातील विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून येत्या २० नोव्हेंबर रोजी राज्यात मतदान पार पडणार आहे. यादरम्यान महायुती सरकारला मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर हे महायुतीतून बाहेर पडले आहेत. इतकेच नाही तर ते आगामी विधानसभा निवडणूक स्वबळावर लढवणार आहेत.

महादेव जानकर हे महायुतीमध्ये गेल्या काही दिवसांपासून नाराज होते त्यामुळे विधानसभा निवडणूक रासप स्वबळावर लढणार आहे.

दरम्यान एका वृत्तवाहिनीशी बोलताना जाणकर यांनी याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे. जानकर म्हणाले की, " आपल्याला माविआ किंवा महायुती यापैकी कोणीही संपर्क केला नाही. या दोघांवर देखील आपण नाराज नाही. मी माझ्या पक्षाच्या वतीने २८८ जागा लढवण्याची तयारी करत आहे. आम्ही आमच्या तकातीवर स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला आहे. लोकसभेला त्यांनी (महायुती) आम्हाला एक जागा दिली होती, त्यांचे अभिनंदन. पण आम्ही आमच्या पक्षाची ताकद वाढवली पाहिजे, आमचा पक्ष मोठा केला पाहिजे. आमच्याही पक्षाचा मुख्यमंत्री, पंतप्रधान झाला पाहिजे यासाठी आम्ही हा निर्णय घेतला आहे."

"आमच्याकडे २०० उमेदवारांचे एका मतदारसंघातील तीन-तीन अर्ज आले आहेत. आता फक्त ८८ जगा राहिल्या आहेत. आम्ही काही ठिकाणी विजयी होऊ, काही ठिकाणी दोन तसेच तीन नंबरची मते घेऊ, आणि काही ठिकाणी किमान १० हजार मते घेऊ असेही जानकर म्हणाले. जेथे उमेदवार मिळेल तेथे उमेदवारी देणार, एकही जागा रिकामी सोडणार नाही असेही जाणकर यांनी स्पष्ट केलं.

#ElectionWithSakal

CM Shinde Govt
MSP Price for Crops Hikes: मोदी सरकारचे शेतकऱ्यांना मोठे दिवाळी गिफ्ट; 'या' पिकांच्या 'एमएसपी'मध्ये केली वाढ

२० नोव्हेंबरला मतदान

राज्यात एकाच टप्प्यात येत्या २० नोव्हेंबरला मतदान होणार असून झारखंड या नक्षलप्रभावित राज्यात दोन टप्प्यांत येत्या १३ व २० नोव्हेंबरला मतदान होईल. याशिवाय महाराष्ट्रातील नांदेड व केरळमधील वायनाड हे लोकसभा मतदारसंघ तसेच विविध राज्यांमधील ४८ विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी याचवेळी मतदान होणार आहे. दोन्ही राज्ये व पोटनिवडणुकीची मतमोजणी येत्या २३ नोव्हेंबरला होईल.

CM Shinde Govt
मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा... व्हीलचेअरवर बसलेल्या दिव्यांग मित्रासाठी मित्राने असं काही केलं की... हृदयाला स्पर्शून जाणारा व्हिडीओ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.