Mahak Chaudhary: बॉलिवूड अभिनेत्रीही निवडणुकीच्या रिंगणात; महादेव जानकरांच्या पक्षातून लढवणार विधानसभा

Mahadev Jankar RSP: काल 21 ऑक्टोबर रोजी महादेव जानकर यांच्या उपस्थितीमध्ये अभिनेत्रीने राष्ट्रीय समाज पक्षात प्रवेश केला.
Mahak Chaudhary with Mahadev Jankar during the announcement of her joining the Rashtriya Samaj Party.
Mahak Chaudhary joining Mahadev Jankar's RSP PartyEsakal
Updated on

राज्यात सध्या सर्वत्र विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. त्यामुळे सर्व आजी माजी आमदारांसह विधानसभेत जाण्यासाठी इच्छुक असलेले कोणत्या ना कोणत्या पक्षाकडून उमेदवारी मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. अशात आता महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षात बॉलिवूड अभिनेत्री मेहक चौधरीने प्रवेश केला आहे. आता विधानसभा निवडणुकीत मेहक चौधरी मुंबईतील वर्सोवा मतदारसंघातून आपले नशीब आजमावणार आहे.

दरम्यान काल 21 ऑक्टोबर रोजी महादेव जानकर यांच्या उपस्थितीमध्ये अभिनेत्री मेहक चौधरीने राष्ट्रीय समाज पक्षात प्रवेश केला. त्यावेळी जानकरांनी मेहक चौधरीला विधानसभेसह उत्तर प्रदेशची जबाबदारी देण्याचे संकेत दिले आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.