MNS Candidates: ठाण्यात राज ठाकरेंचे दोन उमेदवार देणार कडवी झुंज! नावे जाहीर

Assembly Elections Raj Thackeray Candidates: महाराष्ट्र विधानसभेसाठी मनसेने तयारी सुरू केली आहे. आज राज ठाकरेंनी त्यांचे दोन उमेदवार जाहीर केले आहेत.
raj thackeray
raj thackeraySakal
Updated on

Raj Thackeray Candidates Announced: मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी त्यांचे पहिले दोन उमेदवार जाहीर केले आहे. कल्याणमधून राजू पाटील आणि ठाण्यातून अविनाश जाधव हे निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहे, अशी घोषणा राज ठाकरे यांनी केली आहे. ते २४ ऑक्टोबरला अर्ज दाखल करणार आहे. यावेळी अर्ज दाखल करण्यासाठी राज ठाकरेही उपस्थित राहणार आहेत.

आज राज ठाकरे यांनी पुण्यातील नेत्यांची मुंबईत बैठक घेतली. यावेळी त्यांनी पुण्यातील ८ मतदारसंघात उमेदवार निश्चिती केली आहे. पुण्यातील ८ मतदारसंघात राज ठाकरेंचे उमेदवार ठरले आहेत. आता लवकर त्यांची यादी जाहीर होणार आहे. याआधीच राज ठाकरेंनी एका कार्यक्रमात कल्याण मतदारसंघातून राजू पाटील यांना पुन्हा संधी देऊन त्यांना मनसेकडून उमेदवारी दिली आहे. तर ठाण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात अविनाश जाधव यांना उमेदवारी दिली आहे.

raj thackeray
Raj Thackeray यांच्या बैठकींचा धडाका! पुण्यातील 'या' ८ मतदारसंघात शिलेदार ठरले

याबाबत राज ठाकरे यांनी सांगितले की, आमचे बाकी उमेदवार लवकरच जाहीर होतील. मात्र त्याआधी मी कल्याण आणि ठाणे मतदारसंघातून राजू पाटील आणि अविनाश जाधव यांना मनसेचे उमेदवार घोषित करत आहे. हे दोघेही २४ ऑक्टोबरला त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करतील. तसेच हा अर्ज दाखल करण्यासाठी मी स्वत: उपस्थित राहणार आहे. माझं आधीच घर छोटं पडत होतं म्हणून मोठं घर घेतलं. पण आता ही संख्या बघता मला अजून मोठं घर घ्यावे लागेल असे वाटते.

विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने आपली पहिली यादी जाहीर केल्यानंतर आज मनसेने डोंबिवलीमध्ये आपली पहिली यादी जाहीर करत आघाडी घेतली आहे. कल्याण ग्रामीण मधून विद्यमान आमदार राजू पाटील यांना पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आली आहे. तसेच ठाणे येथुन अविनाश जाधव हे उमेदवार असतील असे म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपले पहिले शिलेदार निवडणुकीच्या रिंगणात उतरविले आहेत.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते सोमवारी कल्याण ग्रामीणमधील निवडणूक मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी नेते अभिजित पानसे, आमदार राजू पाटील, अविनाश जाधव, माजी आमदार रमेश पाटील, प्रकाश भोईर, विनोद पाटील यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.