MVA: विधानसभा निवडणुकीपूर्वीच महाविकास आघाडीला झटका, केजरीवालांचा 'तो' निर्णय ठरणार डोकेदुखी

Maharashtra Assembly Election: पुढील दोन महिन्यांमध्ये राज्यात विधानसभा निवडणुकीचा धुरळा उठणार आहे. यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे.
Sharad Pawar, Uddhav Thackeray And Arvind Kejriwal
Sharad Pawar, Uddhav Thackeray And Arvind KejriwalEsakal
Updated on

पुढील दोन महिन्यांमध्ये राज्यात विधानसभा निवडणुकीचा धुरळा उठणार आहे. यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. यामध्ये भाजप, शिवसेने आणि राष्ट्रवादी महायुतीच्या आणि काँग्रेस, उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांचे पक्ष महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढणार आहेत.

दरम्यान 'आम आदमी पक्षाने आज महाराष्ट्रातील विधानसभेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुका लढवणार असल्याचे जाहीर केले. त्यासाठी मुंबईतील पक्षश्रेष्ठींनी आतापासूनच जोरदार तयारी सुरू केली आहे. आम आदमी पक्ष मुंबईतील सर्व ३६ जागा लढवणार आहे. यासाठी आपचे कार्यकर्ते कामाला लागले असून तयारी जोरात सुरू केली आहे,' अशी माहिती आम आदमी पार्टीच्या मुंबई अध्यक्षा प्रीती शर्मा मेनन यांनी मुंबईत पत्रकार परिषदेत दिली.

'आम आदमी पक्षाने अवघ्या १० वर्षांत विकासाचे दिल्ली मॉडेल दाखवून दिले आहे, जिथे सर्वांसाठी दर्जेदार शिक्षण, आरोग्य सेवा, पाणी आणि वीज कोणतेही कर्ज न घेता मोफत दिली जाते. दिल्ली आणि पंजाबप्रमाणे सत्ता आल्यास इतर राज्यातदेखील योजना राबवण्याची पक्षाची इच्छा आहे.

सध्याच्या भाजप-शिंदे सेनेच्या नेतृत्वाखालील सरकारकडे लोकहितासाठी शून्य राजकीय इच्छाशक्ती आहे आणि त्याऐवजी ते केवळ भ्रष्टाचारातच व्यग्र आहेत, कारण त्यांना खात्री आहे की ते सत्तेत पुन्हा येणार नाहीत.

Sharad Pawar, Uddhav Thackeray And Arvind Kejriwal
US Woman Found Chained: स्वत:लाच घेतलं होतं बांधून...जंगलात आढळलेल्या अमेरिकी महिलेबाबत धक्कादायक खुलासा

एकनाथ शिंदे सरकार हे राज्याच्या तिजोरीची एकत्रितपणे लूट करण्याशिवाय दुसरे काही करीत नाहीत. भाजप-शिंदे सेनेने केवळ राज्यघटनेची फसवणूक केली नाही, तर सर्वच आघाड्यांवर आलेले अपयश ही महाराष्ट्रातील जनतेची फसवणूक आहे,' असा घणाघात मेनन यांनी यावेळी केला.

भाजप हा महाराष्ट्रविरोधी आणि मुंबईविरोधी पक्ष आहे. मुंबईचे महत्त्व भाजप संपवू शकत नाही. मुंबई हे भारताच्या आर्थिक विकासाचे इंजिन आहे. मुंबईतील प्रकल्पांना गुजरातमध्ये हद्दपार करून भाजप मुंबईला संपवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करीत आहे, असा हल्लाबोलही मेनन यांनी केला.

Sharad Pawar, Uddhav Thackeray And Arvind Kejriwal
Amol Mitkari: गाडी फोडली तरी मिटकरींची माघार नाही, 'सुपारीबहाद्दर' म्हणत पुन्हा डिवचलं, मनसैनिकांच्या भूमिकेकडे लक्ष!

महाविकास आघाडी जोमात

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने दमदार कामगिरी करत तब्बल 30 जगांवर विजय मिळवला होता. यामध्ये काँग्रेसने सर्वाधिक 14 जगा मिळवत अनपेक्षित यश मिळवले होते. यानंतर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनेही 9 जागा जिंकल्या होत्या, तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने 8 जागांवर विजय मिळवला होता.

महायुतीचा धुव्वा

लोकसभा निवडणुकीत माहायुतीला अनपेक्षितपणे अपयश आले. यामध्ये भाजपच्या बरोबरीला एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासारखे नेते होत. तरीही महायुतीची गाडी अवघ्या 17 जागांवर अडकली होती.

महायुतीत भाजपने सर्वाधिक जागा लढवत 9 जागा जिंकल्या तर मुख्यंत्री शिंदे यांच्या शिवसेनेने 7 जागांवर विजय मिळवला. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला मात्र, एकाच जागेवर समाधान मानावे लागले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.