आगामी विधानसभेसाठी महाराष्ट्रात भाजपाने १५० पेक्षा जास्त जागा लढवाव्यात असे भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांचे मत आहे. लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांना विधानसभा निहाय मिळालेली मते आणि गेल्या विधानसभेत मिळालेली मते, तसेच सर्वेक्षण अहवालाच्या आधारे विधानसभा निहाय उमेदवार निवडले जाणार आहेत.
गेल्या निवडणुकीमध्ये ज्या पक्षाने ज्या जागा जिंकल्या, त्या जागा त्याच पक्षाकडे राहतील, मात्र काही मोजक्या जागांमध्ये फेरबदल होण्याची शक्यता आहे. जिंकून येण्याची खात्री असलेला उमेदवार महायुतीतील कोणत्या पक्षाकडे आहे याबाबत लोकसभा निकाल आणि सर्वेक्षण अहवालाचा आधार घेतला जाणार आहे. यासंदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जागा निश्चितीचा अधिकार कोअर कमिटीच्या बैठकीत देण्यात आला आहे.
कोअर कमिटीच्या बैठकीत जागा वाटप आणि विधानसभेची रणनीती यावर चर्चा झाली. भाजपाचे प्रभारी भूपेंद्र यादव विधानसभा निवडणुकीसाठी अॅक्शन मोडवर आहेत. भाजपाच्या विभागनिहाय मॅराथॉन बैठका घेतल्या जात आहेत. कोअर कमिटीच्या बैठकीनंतर भाजपाच्या महामंत्र्यासोबत भूपेंद्र यादव यांची तातडीची बैठक होणार आहे.
या बैठकीत प्रभारी भूपेंद्र यादव, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, महामंत्री संजय केनेकर, विजय चौधरी, विक्रांत पाटील, माधवी नाईक, चित्रा वाघ आणि श्रीकांत भारतीय उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत प्रामुख्याने महाराष्ट्रातील पाच महामंत्र्यांकडून विभागीय संघटनात्मक आढावा घेतला जाणार आहे. तसेच, अमित शहा १६, १७, १८ तारखेला महाराष्ट्र दौऱ्यावर असणार आहेत. यासंदर्भात देखील नियोजनाचा आढावा घेतला जाणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.