महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने अभूतपूर्व यश मिळवत 233 जागांवर विजय मिळवला आहे. विशेषतः भारतीय जनता पक्षाने (भाजपा) 132 जागांवर विजय मिळवत इतिहास रचला. महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस महायुतीचे किंगमेकर ठरल्याची चर्चा आगे. मात्र या विजयात महाराष्ट्राबाहेरील दोन नेत्यांनी मोठी भूमिका बजावली. याच जोडीने मध्यप्रदेशात देखील मोठा विजय खेचून आणला होता. या विजयामागे वरिष्ठ भाजपा नेते भूपेंद्र यादव आणि रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची प्रभावी रणनीती महत्त्वाची ठरली आहे.