पंतप्रधान नरेंद्र मोदी व देवेंद्र फडणवीस यांनी खऱ्या अर्थाने महाराष्ट्राला अधोगतीला नेले. हा अनर्थ केवळ ‘कमळा’वर शिक्का मारल्याने घडला आहे.
गडहिंग्लज : `छत्रपती शिवरायांचे सरसेनापती प्रतापराव गुर्जर हे स्वामिनिष्ठा आणि निष्ठावंतांचे उत्तम उदाहरण होते. दरम्यान, शरद पवार (Sharad Pawar) यांना सोडून गेलेल्या चंदगड मतदारसंघातील (Chandgad Constituency) फसविणाऱ्यांना गाडण्यासाठी गुर्जर यांच्या बलिदानाने पावन झालेली नेसरी आणि चंदगडची (Chandgad) भूमीच योग्य आहे’, असे प्रतिपादन शरदचंद्र पवार राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी येथे केले.