गेल्या दोन दिवसांपासून मतदारसंघांत मतदारांसाठी मटणाची पाकिटे आणि मसाल्यासाठीचे पैसे वाटप जोरात झाले. त्यानंतर आता ‘लक्ष्मी’ दर्शन किंवा कूपन्स वाटप सुरू आहे.
कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीतील (Maharashtra Assembly Elections) जाहीर प्रचाराची सांगता झाल्यानंतर जिल्ह्यातील सर्वच मतदारसंघात ‘लक्ष्मी’ दर्शन जोरात सुरू झाले आहे. आचारसंहिता पथकाला थांगपत्ताही लागू न देता प्रमुख कार्यकर्त्यांकडून थेट मतदारांच्या घरात त्या घरातील मते किती, याचा हिशोब करून प्रती मतदान पाकिटे किंवा ‘गिफ्ट कूपन्स’ देणारी यंत्रणा कार्यरत झाली आहे.