मुंबई - सहा महिन्यापूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत मुंबई उत्तर पश्चिम मतदार संघातून शिवसेनेच्या रवींद्र वायकर यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेना पक्षाचे अमोल कीर्तिकर यांचा अवघ्या ४८ मतांनी पराभव केला..लोकसभेला एवढ्यात कमी फरकाने पराभव होण्याची बहुधा ही पहिलीच वेळ. याचीच पुनरावृत्ती विधानसभा निवडणुकीत होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्यामुळे पहिल्यांदाच विधानसभेची निवडणूक ही ग्रामपंचायत, महानगरपालिका निवडणुकीप्रमाणे लढली जात आहे..राज्यातील प्रमुख सहा पक्ष, त्यांच्यात झालेली बंडखोरी, स्वतंत्र आघाड्या आणि अपक्ष हे मोठ्या ताकदीने या निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. मतदानासाठी काही दिवसांचा अवधी असल्याने गावातील आणि बाहेरगावी असणाऱ्या मतदारांशी संपर्क सुरू आहे. जो उमेदवार एकेक मतही गांभीर्याने मिळवेल, त्याची विजयाची शक्यता अधिक राहील, अशी परिस्थिती आहे..राज्यातील राजकारण कधी नव्हे इतके ढवळून निघाले आहे. दोन वर्षांत राज्यातील प्रमुख राजकीय पक्षांची संख्या सहावर गेली आहे. त्यामुळे साहजिकच उमेदवारी देताना सर्वच पक्षांना बंडखोरीचा सामना करावा लागत आहे. एकूण २८८ विधानसभा मतदारसंघांपैकी सुमारे १६० मतदारसंघात बंडखोरीने सर्वच राजकीय पक्षांना घाम फोडला आहे.छोटे पक्ष आणि अपेक्षांमुळेही ही निवडणूक अधिक चुरशीची बनली आहे. ज्यांनी सहकारी संस्थांच्या माध्यमातून, जातीच्या माध्यमातून तसेच विकासकामांच्या माध्यमातून मतांचा गठ्ठा तयार केला आहे, त्यांचे या निवडणुकीत खूपच महत्त्व वाढले आहे. यातील अनेकांनी तर स्वतःची उमेदवारी घोषित केली आहे..मतांसाठी कंबर कसलीउमेदवारांची संख्या वाढल्याने अनेक मतदारसंघात विजय आणि पराजयातील फरक हा दोन, तीन आणि चार अंकी राहण्याची शक्यता या क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे प्रदीर्घ काळ राजकारण करणाऱ्या उमेदवारांनी एकेका मतावर लक्ष केंद्रित केले आहे. वाटेल ती किंमत मोजून अशी मते पदरात पाडण्यासाठी त्यांनी कंबर कसली आहे..ज्या उमेदवाराकडे जिल्हा बँक, दूध संघ, सेवा संस्था, पतसंस्था, शिक्षण संस्था, सहकारी बँका संस्थांचे जाळे आहे, त्या उमेदवारांना निवडणुकीचे आणि मतदारांना मतदान केंद्रापर्यंत आणण्याचे नियोजन काही अंशी सोपे जाणार आहे. नवख्या उमेदवाराची मात्र नियोजन करताना दमछाक होईल, अशी परिस्थिती आहे..तरीही भरोसा नाही...जे मतदार बाहेरगावी आहेत त्यांना आणण्यासाठी आतापासूनच गाड्यांची व्यवस्था, हॉटेलची व्यवस्था केली जात आहे. या मतदारांबरोबर दररोजचा संपर्क करण्यासाठीही अनेक उमेदवारांनी मनुष्यबळ तैनात केले आहे. एवढे करूनही संबंधित मतदार ‘त्याच’ उमेदवाराला मतदान करतील, याचा मात्र काही भरोसा नसल्याचेही बोलले जात आहे.#ElectionWithSakal.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.