Wadgaon Sheri Assembly: वडगावशेरीत नवा ड्रामा; बापू पठारे नावाचा आणखी एक उमेदवार

Bapusaheb Pathare : वडगाव शेरीचे राष्ट्रवादीचे(शप) उमेदवार बापूसाहेब पठारे यांचं सेम नावं असणाऱ्या व्यक्तीने उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. या अर्जावर राष्ट्रवादीच्या बापूसाहेब पठारे यांनी आक्षेप घेतला होता. मूळचे श्रीगोंदा तालुक्यातील असणारे बापू बबन पठारे यांनी काल वडगाव शेरीमधून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. बापू बबन पठारे यांनी आपल्या उमेदवारी अर्जात कर्जाचा तपशील, बँक खाते, बँक खात्यात किती रक्कम यापैकी कशाचाच उल्लेख केला नसल्याचा आक्षेप राष्ट्रवादीच्या बापू पठारे यांनी घेतला होता.
Wadgaon Sheri Assembly: वडगावशेरीत नवा ड्रामा; बापू पठारे नावाचा आणखी एक उमेदवार
Updated on

पुणे : पुण्यातील आठ विधानसभा मतदारसंघांपैकी वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघ हा सर्वात नाट्यमय घडामोडी घडणारा विधानसभा मतदारसंघ ठरला आहे. सुरुवातीला उमेदवार ठरवण्यावरून महायुतीत धुसफूस झाली, अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी जगदीश मुळीक हे पक्षाचा अधिकृत एबी फॉर्म घेऊन अर्ज दाखल करण्यासाठी पोहोचले होते. मात्र देवेंद्र फडणवीस यांचा फोन आला आणि जगदीश मुळीक फॉर्म न भरताच माघारी फिरले. गेल्या आठ दिवसांपासून नाट्यमय घडामोडी सुरू असताना बुधवारी अर्ज छाननीच्या पहिल्या दिवशी देखील नवीन ड्रामा वडगाव शेरीत पाहायला मिळाला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.