अंबड : गुलाबी थंडीत गाव, वाडी-वस्ती, तांड्यावर आता भल्या पहाटे व सायंकाळी शेकोट्या पेटविल्या जात असून येथे गल्ली ते दिल्लीपर्यंतच्या राजकारणावर गप्पा रंगत आहेत. त्यातच विधानसभेची निवडणूक जाहीर झाली असून कोणाला कोणत्या पक्षाकडून अधिकृत उमेदवारी मिळाली, कोणाचे तिकीट नाकारले, कोण अपक्ष, मतांची गोळाबेरीज, शक्तिप्रदर्शन आदी विषयांवर देखील चर्चा रंगू लागल्या आहेत.