Sharad Pawar NCP: शरद पवारांनी मंत्रिपदाचा शब्द दिलेल्या आमदाराविरोधात कोण लढणार? जाणून घ्या शिरूर मतदारसंघाची परिस्थिती
Maharashtra Assembly Election 2024:
राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये पडलेल्या फूटीनंतर विद्यमान आमदार ॲड. अशोक पवार हे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासोबत राहिल्याने त्यांची विधानसभा निवडणूकीतील उमेदवारी निश्चीत मानली जात आहे.
लोकसभा निवडणूकीवेळी झालेल्या प्रचार सभेत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी शिरूर तालुक्याला मंत्रिपदापासून दूर ठेवता येणार नाही, असे जाहिर आश्वासन दिले होते. त्यामुळे अशोक पवार यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाल्याचे मानले जात आहे.
लोकसभा निवडणूकीतील २७ हजारांच्या मताधिक्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची बाजू अत्यंत प्रबळ मानली जात आहे.
अशी आहे स्थिती
ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासोबत राहिल्याने ॲड. अशोक पवार यांची उमेदवारी जवळपास निश्चित.
लोकसभा निवडणूकीत २७ हजारांच्या मताधिक्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची बाजू प्रबळ.
घोडगंगा कारखान्याची २५ वर्षे सत्ता अशोक पवारांच्या ताब्यात होती. तरीही कारखाना बंद पडला.
जिल्हा बॅंकेच्या संचालिका जयश्री पलांडे यांच्याकडून भाजपची मजबूत बांधणी केली. प्रदीप कंद यांचेही नाव आघाडीवर.
विद्यमान आमदार राष्ट्रवादीचा असल्याने ही जागा राष्ट्रवादीच्या वाट्याला जाईल, या अपेक्षेने दादा पाटील फराटे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला.
निवडणूकीतील मुद्दे
पुणे-नगर व पुणे-सोलापूर या महामार्गांवरील वाहतूक कोंडी
रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखाना बंद पडल्याचा मुद्दा गाजू शकतो.
रांजणगाव एमआयडीसीबरोबरच कोरेगाव भीमा, सणसवाडी व शिक्रापूर मधील वाढत्या औद्योगिकरणामुळे प्रदूषणाची समस्या.
परप्रांतिय कामगारांमुळे अनेक गावांमध्ये बकालपणा, गुन्हेगारी वाढली.
अनेक महत्वाच्या गावांत घनकचरा व्यवस्थापन व सांडपाण्याचा प्रश्न गंभीर.#ElectionWithSakal
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.