Maharashtra Assembly Election 2024 : महाराष्ट्र नोंदवेल का ६५ टक्के मतदान? दहा वर्षांपासून ६० टक्केच नोंद
महाराष्ट्रात १९९५ मध्ये खऱ्या अर्थाने सत्तापालट झाला, त्या वेळी मतदान दहा टक्क्यांपेक्षा अधिक वाढले होते. तर २०१४ मध्ये पुन्हा सत्ता बदलली तेव्हा मतदान ४ टक्क्यांनी वाढले होते.
मुंबई - महाराष्ट्राने २०१४ पासून म्हणजे केंद्रात भाजप सरकारच्या राजवटीला प्रारंभ झाल्यापासून ६० टक्के मतदानाची पातळी गाठली आहे, ती राजकीय पक्षांच्या गर्दीमुळे ६५ टक्क्यांचा आकडा यंदा ओलांडेल काय, असा प्रश्न केला जातो आहे.