पुणे - विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पश्चिम महाराष्ट्रात सोलापूर आणि पुणे येथे दोन सभा मंगळवारी (ता. १२) होणार आहेत. या दोन्ही सभांसाठी पश्चिम महाराष्ट्रातून कार्यकर्ते, नागरिक उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती भाजपचे प्रदेश महामंत्री राजेश पांडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.