तुम्ही श्रीमंतांनी काढलेला कारखाना जवाहरलालला चालवायला देताय. हा कारखाना कधी सर्वसामान्य सभासद शेतकऱ्यांच्या हातात न येणार असा करार श्रीमंतांनी करून ठेवला असल्याचा आरोपही अजित पवार यांनी करार वाचताना केला.
सांगवी : श्रीमंतांना कमी लेखणे म्हणजे आम्हाला महाराष्ट्रात राहणे मुश्कील होईल. साखरवाडीच्या सभेत मी श्रीमंतांना आमदार केले असे म्हटलो; पण मी पक्षाचा अध्यक्ष असताना तू कसे आमदार केले, असा प्रश्न शरद पवार (Sharad Pawar) यांनी केला होता. त्यावर जेव्हा पवार साहेब आमदार झाले तेव्हा मी तिसरीत होतो आणि जर श्रीमंतांना शरद पवार यांनी आमदार केले तर ते त्यांच्या सभेत का नव्हते असा पलटवार उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी केला.