मुंबई: आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने बंडखोरी करणाऱ्या 40 सदस्यांवर कडक कारवाई करत त्यांना पक्षातून हकालपट्टी केली आहे. या कठोर निर्णयामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. या बंडखोरांमध्ये श्रीकांत भारतीय यांच्या भावाचा समावेश असून, पक्षाच्या निर्णयामुळे भाजपमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे.