Maharashtra Assembly Election : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची मुंबईत पत्रकार परिषद घेतली, या पत्रकार परिषदेदरम्यान भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला मात्र यावेळी एका व्यक्तीने शहा यांना विरोध दर्शवत गोंधळ घातला. अमित शाह यांची पत्रकार सुरु असताना हा व्यक्ती उभा राहिला आणि त्याने महागाई आणि बेरोजगारीवरुन शाह यांना विरोध केला. मात्र या व्यक्तीला भाजपा कार्यकर्त्यानी ढकलत हाॅल बाहेर नेल्याने पुढील गोंधळ टळला.