Maharashtra Assembly Election 2024: विधानसभेची रणधुमाळी आजपासून! लढती अजूनही अस्पष्ट; उमेदवारी अर्ज स्वीकारण्याला सुरवात

Assembly Election Nomination Form Process: सर्व नऊ विधानसभा मतदारसंघांसाठी नऊ निवडणूक अधिकारी नियुक्त करण्यात आले असून, त्या कार्यालयांचे कामकाज सुरू झाले.
Candidates filling out nomination forms for the Maharashtra Assembly elections
Candidates nomination processEsakal
Updated on

छत्रपती संभाजीनगर: विधानसभेच्या रणधुमाळीला मंगळवारपासून (ता. २२) सुरुवात होत आहे. सकाळी ११ ते दुपारी तीनपर्यंत त्या-त्या विधानसभा मतदारसंघ कार्यालयात नामनिर्देशन पत्र इच्छुकांना दिले व स्वीकारले जाणार आहेत.

दरम्यान, अनेक ठिकाणी प्रमुख पक्षांचे उमेदवार अद्याप निश्चित नाही. केंद्रीय निवडणूक आयोगाने वैजापूर आठवडाभरापूर्वी महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. त्याबरोबरच प्रशासनाने जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू केली. निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.