Maharashtra Assembly Election: राज ठाकरेंची मुंबईतील घाटकोपरमध्ये आज पहिली प्रचार सभा पार पडली. यावेळी त्यांनी मशिदीवरील भोंगे आणि रस्त्यावर नमाजाबाबत आक्रमक भूमिका घेतली. ते म्हणाले की, धर्म कोणताही असो तो घराच्या चार भिंतीआड पाहिजे, तो रस्त्यावर येता कामा नये. आमची सत्ता आली तर मशिदीवरील भोंगे बंद करु तसेच रस्त्यावर नमाज पडणे देखील बंद करु.
महाराष्ट्राचं गतवैभव परत मिळवून द्यायचं आहे सत्ता देऊनही नालायक ठरलो तर परत तोंड दाखवणार नाही, असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज ठाकरे यानी ठणकावून सांगितले. राज ठाकरेंनी मनसेचे घाटकोपरमधील उमेदवार गणेश चुक्कल यांच्या प्रचारसभेत सत्ताधारी महायुती आणि महाविकास आघाडीवर जोरदार निशाणा साधला.