Shiv Sena Shinde Vs Thackeray: गद्दारीचा आरोप झालेल्या शिंदे सेनेला मतदारांची साथ! ठाकरेंची सेना पिछाडीवर; जाणून घ्या आकडेवारी
Shivsena Result: महायुतीमध्ये एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या वाट्याला ८० जागा आल्या होत्या. तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या वाट्याला ५१ जागा होत्या. तर भाजप सर्वाधिक म्हणजे १४६ जागा लढवत होतं. दुसरीकडे महायुतीमध्ये काँग्रेसने १०१ जागा लढल्या. शिवसेना ठाकरे गटाने ९५ जागा लढल्या तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीने ८६ जागा लढल्या.
Maharashtra Assembly Election Result 2024: विधानसभा निवडणुकांसाठी शनिवारी मतमोजणी होत आहे. सुरुवातीला हाती आलेल्या कलांनुसार राज्यामध्ये पुन्हा महायुतीचं सरकार येण्याची शक्यता आहे. दुपारनंतर काय परिस्थिती निर्माण होते, हे पाहाणं महत्त्वाचं आहे.