MLA Rohit Pawar: "आमच्या बालेकिल्ल्यात मायनस झाल्यावर कुठेतरी पाणी मुरत असल्याचे जाणवायला लागले आहे. लाडकी बहीण योजनेचा महायुतीला वाटावा तेवढा फायदा झाला नसावा. यामागे दुसरे काहीतरी कारण असावे, त्याचा अभ्यास करायला हवा."
कऱ्हाड : विधानसभेतील (Maharashtra Assembly Election) संख्याबळ १६० च्या पुढे कसे गेले, याचे आश्चर्य भाजपच्या (BJP) लोकांनाही वाटत असेल. कुणाल पाटील यांना त्यांच्या राहत्या गावात एकही मत मिळाले नाही, हे आश्चर्यकारक आहे. महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला (Gujarat) जातात आणि गुजरातची ईव्हीएम (EVM) महाराष्ट्रात येतात. त्यामुळे त्यात काहीतरी घोळ असून, महाराष्ट्रातील बऱ्याच उमेदवारांचे मताधिक्य जवळपास सारखेच कसे काय? ईव्हीएमबाबतची भूमिका नक्कीच संशयास्पद आहे.