Digital Engagement: Driving Voter Awareness in Maharashtra:
आदर्श आचारसंहिता लागू होताच विविध पक्षांच्या कार्यकत्यांनी सोशल मीडियावर आमचाच नेता आमदार होणार, अशी टॅगलाइन सुरू केली आहे. गावागावात पारावर चर्चेला उधाण आले आहे. काही हौशी कार्यकर्ते तर विधानसभेचे तिकीट आमक्याला, तमक्याला मिळेल, यासाठी पैजा लावीत आहेत.
निवडणुकांच्या प्रचारासाठी राजकीय पक्ष वेगवेगळ्या तंत्रांचा अवलंब करीत असतात. त्यामध्ये सभा, पदयात्रा, बॅनर आदींचा वापर केला जातो पूर्वी गावात "ताई, माई, अक्का... मारा शिक्का" ही घोषणा देणारी जीप गावात आली की, निवडणुकीची धामधूम सुरू झाल्याचे निश्चित होते; पण आता डिजिटल युगात उमेदवारांची प्रचाराची धुरा इव्हेंट कंपन्यांनी घेतली आहे. त्यामुळे रस्त्यावरच्या कार्यकत्यपिक्षा सोशल हँडर्सचा चांगलाच वट वाढला आहे.